मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

मियावाकी घन वन प्रक्रल्प राबविण्याचे आवाहन

 

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : मियावाकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञाने कमी जागेमध्ये घन वन संकल्पना विकसित केली असून हा प्रकल्प लोकांमध्ये रुजत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालये व महाविद्यालयाच्या आवारात मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या सभेमध्ये नुकत्याच केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वांनी या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एम.बी.चंदनशिवे यांनी केले आहे.

000000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.