कोल्हापूर,
दि.24 (जिमाका): प्रकल्पग्रस्तांच्या
अडीअडचणींचा निपटारा होण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे कामकाज जलदगतीने करण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यातील
पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड वाटपाबाबत कार्यक्रम निश्चित
केला आहे. त्या-त्या प्रकल्पातील जमीन व भूखंड मिळण्यास शिल्लक असलेल्या
प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणी अर्ज नमुद केलेल्या ठिकाणी सकाळी 11 ते
सायंकाळी 5 या वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन पुनर्वसन
विभागाच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी केले आहे.
प्रकल्पाचे
नाव, उपविभागाचे नाव, अर्ज करावयाचा दिनांक व अर्ज सादर करावयाचे ठिकाण खालीलप्रमाणे-
दुधगंगा प्रकल्प- उपविभागीय
अधिकारी, करवीरसाठी दि. 27 जानेवारी 2022 रोजी जिल्हा पुनर्वसन कार्यालय.
उपविभागीय
अधिकारी, इचलकरंजी उपविभागासाठी दि. 2 व 3 फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार कार्यालय
हातकणंगले.
दि. 9 व 10
फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार कार्यालय शिरोळ.
उपविभागीय अधिकारी, कागलसाठी दि. 16 व 17 फेब्रुवारी
2022 रोजी तहसिलदार कार्यालय कागल.
दि. 23 व 24
फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार कार्यालय
राधानगरी
तुळशी प्रकल्प- उपविभागीय
अधिकारी, करवीरसाठी दि. 3 व 4 मार्च 2022
रोजी जिल्हा पुनर्वसन कार्यालय व उपविभागीय अधिकारी राधानगरी-कागलसाठी दि. 9 व 10 मार्च 2022 रोजी तहसिलदार कार्यालय
राधानगरी याप्रमाणे राहील.
नमुद
केलेल्या दिनांकास व ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड मिळालेला नाही
त्यांनी अर्ज व त्यासोबत 65 टक्के रक्कम भरल्याचा पुरावा व बुडीत जमिनीची कागदपत्रे
सादर करावीत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.