सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत -निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव

 

          कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावयाचे आहे. यासाठी www.kolhapur.gov.in  या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या नावे दि. 14 डिसेंबर पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील कार्यालयातील टपाल विभागामध्ये सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.

       अर्ज तांत्रिक (निविदा फार्म क्र. 1) व वित्त (निविदा फार्म क्र. 2) असे दोन स्वतंत्र लिफाफ्यामध्ये सादर करावेत. दोन्ही लिफाफ्यांपैकी तांत्रिक लिफाफा प्रथम उघडला जाईल व पात्र संस्थेचा वित्तीय दरपत्रकाचा लिफाफा उघडून लघुत्तम निविदाकारास या कामकाजासाठी नेमण्याची शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. संस्थेचा नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा राहील, असेही श्री. जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.