कोल्हापूर, दि.
9 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यातील उमेदवारांना
विविध खाजगी क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या
दृष्टीने दि. 12 ते 17 डिसेंबर या कालावधीत ‘ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळावा’
आयोजित करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त
सं.कृ.माळी यांनी कळविले आहे.
या राज्यस्तरीय “ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात” 5 वी ते 12, पदवीधर,
पदवीत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बी. ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांची
राज्यात किमान 25 हजार व जिल्हयातील किमान 800 पदांसाठी खाजगी उद्योजकांनी सहभाग नोंदविला
आहे. रिक्तपदांची नोंदणी “महास्वयंम”
या वेब पोर्टलवर केली आहे.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या
उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी
युझर आयडी व पासवर्डच्या आधारे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन
करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आवश्यक पात्रता धारण
करीत असल्याची खात्री करुन पसंतीक्रम व इच्छूकता
ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने विहित केलेल्या अटी
व शर्तीचे पालन करणे / संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या
उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण,
दिनांक व वेळ एसएमएस अलर्टंद्वारे अथवा दुरध्वनीद्वारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल
व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
तरी इच्छुक युवक/युवतींनी पसंतीक्रम
नोंदवून या संधीचा न चुकता लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र
0231-2545677 वर संपर्क साधावा.
00 0 0
0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.