गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

भारतीय डाक विभागामार्फत भाविकांना पर्यावरणपूरक कापडी प्रसाद थैली प्रदान

 

    

             



कोल्हापूर दि. 16 (जिमाका): भारतीय डाक विभागामार्फत प्लॅस्टिकचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन भाविकांकडून प्रसादासाठी होणारा प्लॅस्टिक बॅगेचा वापर टाळण्यासाठी भारतीय डाक विभाग कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक कापडी प्रसाद थैली प्रदान करण्याचा कार्यक्रम  आज महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपामध्ये संपन्न झाला.

भारतीय डाक कोल्हापुर विभागामार्फत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीस भक्तांना देण्यासाठी १० हजार कापडी पिशव्या सुपुर्द करण्यात आल्या. ० ते ५ वयोगटातील लहान मुलांचे आधार कार्ड पोस्टमनदद्वारे मोबाईलवर काढण्याची सेवा टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार चि. समर राजेंद्र पाटील या बालकाचे आधार कार्ड काढून या मोहिमेचा शुभारंभ झाला. मुख्य पोस्ट्मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईच्या वीणा आर. श्रीनिवास (IPoS), पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे,  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे  व्यवस्थापक महादेव दिंडे व कोल्हापूर टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 कार्यक्रमास अमोल कांबळे, संदिप कडगावकर, भरत पगार, राजेंद्र पाटील, अमोल शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.