कोल्हापूर,दि. 9 (जिमाका) : कोविड-19 आजारामुळे मृत पावलेल्या
व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह
ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in
यावर लॉगिन करणे आवश्यक राहील, तसेच यासाठी https//epassmsdmamahait.org/login.htm
यावर देखील लिंक देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.
मयत व्यक्तिचा जवळचा नातेवाईक जसे, आई/वडील/मुलगा/मुलगी/पत्नी/
पती सानुग्रह अनुदान मागणीसाठी अर्ज करू शकतो/शकते.
अर्जदारास
त्याचा 1) आधार क्रमांक
2)
मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
3)अर्जदाराच्या
आधार कार्डची प्रत
4)
मयत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत
5)
मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला (जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अंतर्गत)
6)अर्जदाराच्या
आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्याचा तपशील
7)अर्जदाराच्या
खात्याच्या रद्द केलेला धनादेश
8)
मयत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण दर्शवणारे वैद्यकीय प्रमाणपत्र
9)
RTPCR किंवा CT-Scan इतर वैदयकीय कागदपत्रे (जर अ.क्रं.- 8 कागदपत्र उपलब्ध नसल्यास)
आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक
वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे
मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची
मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी कोविड-19 मृत्यूचे कारण
दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची
मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय
प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास
अर्जासोबत द्यावी लागतील.
जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय
क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग न्यायिक-2021/प्र.क्र.488/ आरोग्य-05, दिनांक
13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हा स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार
निवारण समिती सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक, कोल्हापूर यांच्याकडे अपिल करण्याचे व
या समितीस अशा प्रकरणाची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत:
मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.
सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व
अर्ज 7 दिवसाकरीता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, त्यानंतर 7 दिवसांनी हे सानुग्रह
सहाय्य अर्जदाराच्या बँक खात्यावर थेट (DBT) जमा करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत
व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय क्रमांक सीएलएस-2021/प्र.क्र.254/म-3 26 नोंव्हेंबर,
2021 हे Online Web Portal विकसित केले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.