गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांबाबत शनिवारी वेबिनार

 


कोल्हापूर, दि.16 (जिमाका) : कोव्हीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘जागतिक अल्पसंख्याक हक्क दिवस’ ऑनलाईन वेबिनारव्दारे शनिवार दि. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येणार आहे.

18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत अल्पसंख्याक विकास विभागाने कळविले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती वेबेक्सव्दारे 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता देण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.