कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ज्या
विद्यार्थ्यांना अद्याप ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे शक्य झालेले नाही तसेच ज्या उमेदवारांच्या
प्रवेश अर्ज भरताना चुका झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी 15 डिसेंबर रोजी सायं.
5 वाजेपर्यंत आपले नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
सर्व उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेत प्रत्यक्ष
संपर्क साधावा. प्रवेश अर्ज भरण्यासाठी
I.T.I.AdmissionPortal-http://admission.dvet.gov.in हे संकेतस्थळ पहावे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.