कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका) : राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत 75 वा आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रम
सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर मार्फत तालुकास्तरीय शाळांमध्ये हरित सेना योजनांच्या
अनुषंगाने मोफत वृक्ष वाटप करुन वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील
सर्व माध्यमिक शाळा, कॉलेज यांनी जास्तीत-जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे,
असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय हरित
सेनेच्या शाळांमार्फत 75 वृक्षांची लागवड करुन त्यास आपल्या क्षेत्रातील स्वातंत्र्य
सैनिकाचे नाव द्यावयाचे आहे. याकरिता सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत
शाळेस 75 रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळेव्यतिरिक्त इतर शाळेमार्फत हा कार्यक्रम
राबविण्यास इच्छुक असल्यास 7 दिवसांच्या आत सामाजिक वनीकरण विभागास कळवावे. वृक्षारोपण
31 डिसेंबर पूर्वी करावयाचे असून लागवड करावयाची 75 रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल.
मोफत पुरवठा करण्याअगोदर त्या शाळेने 75 खड्डे खोदल्याचे फोटो सामाजिक वनीकरण विभागास
दाखविणे बंधनकारक राहील, असेही सामाजिक वन विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.