कोल्हापूर,
दि. 17 (जिमाका): गुळ उत्पादन, खरेदी आणि विक्रीच्या दृष्टीने राज्यातील सर्वात
मोठी गुळाची उलाढाल असलेल्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने
ऊसाच्या रसात साखर मिक्स करुन साखरमिश्रीत गुळ उत्पादन करणाऱ्या उत्पादकांविरुद्ध
विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक
आयुक्त तु.ना.देशपांडे यांनी दिली आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने प्रयाग चिखली, वरणगे पाडळी आणि वंदूर
येथील गुळ उत्पादक गुऱ्हाळघर चालकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तीन
ठिकाणी गुळ उत्पादन करताना साखर वापरत असल्याचे आढळून आल्यामुळे अन्न व औषध
प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. तीनही ठिकाणी एकूण गुळाचा 4999 कि.ग्रॅ. किंमत
रु. 1 लाख 75 हजार 968 रुपयांचा साठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून आणि साखरेचा 11,348.4
कि.ग्रॅ. किंमत 3 लाख 62 हजार 056
रुपयांचा साठा गुळामध्ये भेसळीसाठी वापरत असल्याच्या संशयावरून नमुने घेऊन जप्त
करून ठेवलेला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु.ना. शिंगाडे, श्री. केंबळकर
तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कोळी, श्री. पाटील आणि श्री. कदम यांनी या
कारवाईमध्ये सहभाग घेतला. मोहीम अशीच सुरु राहणार असून जिल्ह्यातील गुळ
उत्पादकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसारच गुळ उत्पादन करावे, असे
आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.