कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज यांच्या
संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 12 जुलै 2019 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक संचालक ज. बा. करीम
यांनी दिली.
राजर्षि छत्रपती
शाहू कॉलेज, सदर बाजार, कोल्हापूर येथे 10-30 ते 2-30 या वेळेत रोजगार मेळावा होणार
आहे. रोजगार मेळावा पंडीत दीन दयाळ उपध्याय
अल्पसंख्यांक व इतर सर्वांसाठी असून 10 वी ते पदवीधर एमबीए, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरींग,पदव्युत्तर
बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज योजनेची सविस्तर माहिती
दिली जाणार आहे.
रोजगार
मेळाव्यात कोल्हापूरमधील नामवंत उद्योजक उपस्थित राहणार असून त्यांच्या आस्थापनाकडे
रिक्त असलेल्या पदासाठी मुलाखती घेऊन भरती
केली जाणार आहे. यामध्ये क्रॉसलॅड, शाहूपुरी,
कोल्हापूर, कॉम्पसर्व्ह कन्सलटंट्स प्रा.लि.कोल्हापूर, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट प्रा.लि.कोल्हापूर,
आयसीआयसीआय बँक सेल्स अकॅडमी कोल्हापूर, मेनन बोअरिंग लि.कोल्हापूर, मेनन अल्कॉफ,पार्ट
ऑफ बेअरिंग लि.कोल्हापूर, डेक्कन मॅनेजमेंट कोल्हापूर, युरेका फोर्बस प्रा.लि. न्यु
शाहूपुरी कोल्हापूर, रॉयल ब्लू मल्टिट्रेड प्रा.लि.कोल्हापूर, स्टार हेल्थ इन्शुरंस
कोल्हापूर, ब्रेनी स्टारर्स अकॅडमी राजारामपूरी कोल्हापूर, युनिटी मोटार्स गोकुळ शिरगाव
कोल्हापूर, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर, स्कायलार्क ग्लोबल बी.पी. ओ.स.प्रा.लि. कोल्हापूर,
डि एम सी एफ एस पुणे (नीम ट्रेनि)कोल्हापूर, सिंपुकडे ग्रुप ऑफ कंपनी गोकुळ शिरगाव,
कोल्हापूर, संम्मती प्रोसिझेंन्सी लि. कोल्हापूर, तांबवे इंडस्ट्रिज लि. शिरोली, सुवर्ण
अलायन्स प्रा. लि. कागल, फार्मा ओ रोड कार्पोरेशन लि. कोल्हापूर आणि वर्ल्ड वाईल्ड
आय.टी. ई ए. कोल्हापूर या अस्थापनामधील रिक्त
पदांची भरती करण्यात येणार आहे.
रोजगार मेळावा व कर्ज योजनेची सविस्तर माहिती
www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी रोजगार
मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक संचालक ज.बा.करीम यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.