बुधवार, १७ जुलै, २०१९

ओंकार नवलिहाळकरची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड





कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : येथील ओंकार राजीव नवलिहाळकर याची 2016-17 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी  निवड झाल्याचे केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली.
            युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे अव्वर सचिव रवी कुमार सिन्हा यांनी 15 जुलै रोजी याबाबत ओंकार यास पत्र दिले आहे.  12 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील नियोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ओंकार गेले कित्येक वर्ष कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्था यांच्यासोबत त्याने अनेक वेळेला अनेक लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे.
            सलाम मुंबई फाऊंडेशन च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखू मुक्ती ची शपथ घेतली. ओंकार यांच्या संपूर्ण जीवन प्रवास हा अत्यंत खडतर असा आहे लहानपणी आर्थिक परिस्थितीमुळे ओंकारच्या आई-वडिलांनी ओंकारला पाळणाघरात ठेवले पाळणाघरात खेळता-खेळता एका मुलाने डोळ्यामध्ये टाचणी घातल्यामुळे  ओंकारच्या डाव्या डोळ्या ला अपंगत्व आले. एका डोळ्याने दिव्यांग असून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात  संपूर्ण महाराष्ट्रातून ओंकारचा प्रथम क्रमांक आला. संसदवारी उपक्रमांतर्गत २ ऑगस्ट २०१८ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ओंकारने भेट घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.