कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : येथील विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण कार्यालय परिसरात मुख्य वनसंरक्षक (प्रा.) डॉ. व्ही.
क्लेमेंट बेन यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन
33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या सर्व जागेचे ड्रोनद्वारे
चित्रीकरण करण्यात आले असून, रोपवनांची व रोपवाटीकांची माहिती वन विभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यातील 1027 ग्रामपंचायतींना प्रत्येकी
3201 प्रमाणे एकूण 32.87 लक्ष रोपे लागवडीसाठी मोफत पुरवठा करण्यात येणार आहेत.
त्यापैकी आज पर्यंत 46 ग्रामपंचायतींना रोपे देण्यात आलेली आहेत. उर्वरीत
ग्रामपंचायतींना रोपे पुरवठा करणे सुरु आहे. या शिवाय इतर विभाग व शेतकरी यांना
वनमहोत्सवामध्ये सवलतीच्या दरात (लहान रोप 8रु., मोठे रोप 40 रु.) पुरवठा
करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने उदिष्टापेक्षा 10 लाख रोपे जादाची तयार केलेली
आहेत. बाजारपेठा, बस स्थानक व इतर गर्दीच्या
ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे विक्री केंद्र उभारुन नागरिकांना
सवलतीच्या दरात रोप विक्री केली जाणार आहेत.
काल 1 जुलै रोजी झालेल्या वृक्षारोपण
कार्यक्रमाप्रसंगी वन्यजीव वनसंरक्षक सत्यजीत गुजर, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे,
निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक सुहास साळोखे, राजन देसाई,
वनक्षेत्रपाल निकेत शिंदे, बिन खांबी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जिरळे
आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.