शुक्रवार, २६ जुलै, २०१९

'पोस्ट ऑफिस आपल्या दारी' जिल्ह्यात सुरू वरिष्ठ अधिक्षक ईश्वर पाटील यांची माहिती


                               
कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोस्ट विभागाकडून आजपासून स्वातंत्र्य दिनापर्यंत पोस्ट ऑफिस आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिक्षक ईश्वर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
         श्री. पाटील यावेळी म्हणाले, 26 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान हा उपक्रम होणार असून या अंतर्गत प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक यांना पोस्टाची संलग्न करण्याचा प्रमुख उपदेश आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या वित्तीय समावेशन योजनेत सहभागी करून लाभार्थी करायचे आहेत. रक्षाबंधनचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकी जपत फक्त  रूपयात खाते उघडून बहिणीचा विमा उतरवता येणार आहे. या अंतर्गत एक बचत खाते 2 लाखाचा विमा आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्याची संधी मिळणार आहे.
         या उपक्रमांतर्गत बचत खाते उघडणे, टपाल जीवन विमा व त्याचे फायदे लोकांपर्यत पोहचविणे, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेंशन योजनेमध्ये जास्तीत-जास्त लोकांना सामावून घेणे, सुकन्या समृध्दी योजना घरोघरी पोहचविणे, इंडिया पेास्ट पेमेंटस् बँकेबाबत जनजागृती करून खाती उघडणे, डिजिटल पेमेंटस् स्वीकारण्यासाठी सक्षम बनविणे, मेरा अभिमान सक्षम ग्राम योजनेतंर्गत जास्तीत-जास्त खेडी डिजिटल बनविणे याचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
            जिल्ह्यात विविध ठिकाणी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणसाठी शिबीर घेण्यात येणार आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले, कोल्हापूर पोस्ट विभागास 7 प्रथम श्रेणीचे पुरस्कार व 1 व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शाखा व्यवस्थापक अमोल कांबळे उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.