गुरुवार, २५ जुलै, २०१९

शेळी पालन व कुक्कुट पक्षी संगोपनासाठी ऑनलाईन अर्ज करा -जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. पठाण



कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : राज्यातील ठाणबंद अंशत: पध्दतीने शेळी पालनासाठी 10+1 शेळी गट पुरवठा करणे व 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे या दोन नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. पठाण यांनी दिली.
       दोन्ही योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने प्रादेशिक पशुसंवर्धन सह. आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरावरील योजनेची मूल्यमापन समितीमार्फत करण्यात येणार आहे. लाभार्थी निवडीसाठी 3 टक्के दिव्यांग व 30 टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशिल http://ah.mahabms.com  या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील  AH MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने  स्विकारले जातील. ही वेबसाईट दिनांक 25 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यत उपलब्ध आहे.
        10+1 शेळी गट पुरवठा करणे या योजनेसाठी जिल्ह्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 68 व अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 50 असे एकूण 118 लाभार्थ्यांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे 1000 मांसल कुक्कुट पालन पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 31 अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 20 असे एकूण 51 लाभार्थ्यांचे भोतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
            शेळी पालन योजनेसाठी सर्व सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निवडीचे निकष याप्रमाणे  दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक लाभार्थी, अल्प  भूधारक लाभार्थी, सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी, महिला बचत गटातील लाभार्थी.
            कुक्कुट पक्षी योजनेमध्ये लाभार्थी निवडीचे निकष याप्रमाणे  अत्यल्प भूधारक लाभार्थी, अल्प  भूधारक लाभार्थी, सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी, महिला बचत गटातील लाभार्थी.
           
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.