कोल्हापूर,
दि. 5 (जिमाका) :
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयात काही
अटींमध्ये बदल करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली असल्याचे फलोत्पादन संचालक प्र. ना.
पोकळे यांनी कळविले आहे.
फळबाग लागवडीचा कालावधी माहे जून ते मार्च
अखेरपर्यंत राहील. शेतक-यांना आवश्यकतेनुसार 16 फळपिकांच्या कलमे-रोपांची लागवड
करण्यास मान्यता आहे. कोकण विभागाकरिता जास्तीत जास्त 10 हेक्टर तर उर्वरीत
विभागाकरिता जास्तीत जास्त 6 हेक्टर या
अनुज्ञेय क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेण्यासाठी 5 हेक्टर पेक्षा जास्त
क्षेत्रावरील फळबाग लागवडीकरिता 100 टक्के अनुदान या योजनेतूनच देय राहिल.
फळबाग
लागवड योजनेंतर्गत ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य असलेली अट शिथिल करुन कोकणातील
ज्या शेतक-यांना डोंगर उताराचे क्षेत्र जास्त व विहिरींची संख्या कमी असल्यामुळे
ठिबक सिंचन संच बसविणे शक्य होत नाही. योजनेतील इतर घटकांचा लाभ घेवू इच्छितात अशा
शेतक-यांना शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या झाडे जगवण्याच्या अटीवर अन्य घटकांचा
लाभ घेता येईल.
लाभार्थीने
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत त्याच सर्व्हे क्रमांक -गट क्रमांक करिता लाभ घेतलेला असेल व
ठिबक सिंचन संचाचे आयुर्मान किमान 4 वर्षांपर्यंत बाकी असेल व सदर संच नविन
फळबागलागवडीच्या अंतरासाठी योग्य असेल तर
अशा ठिकाणी ठिबक सिंचन ही बाब न राबविता
योजनेतील इतर घटकांचा लाभ देय राहील. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय बागवानी
मंडळामार्फत मानांकीत खासगी रोपवाटीका यांबरोबरच कृषी विभागाच्या परवानाधारक
रोपवाटीकेतून कलमे-रोपे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रशासकीय खर्चामध्ये अनुज्ञेय
असलेल्या खर्च रक्कमेच्या मर्यादेत एका शासकीय रोपवाटीकेतून अन्य शासकीय
रोपवाटीकेमध्ये कलमे-रोपांची वाहतूक
करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
00 0 0
0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.