कोल्हापूर,दि.20 (जि.मा.का.) : आयएसओ नामांकनाच्या
माध्यमातून चैतन्य निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यामध्ये
गरज निर्माण करा. त्यांची इच्छाशक्ती वाढवा, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयएसओ 9001:2015 नामांकन प्राप्त पशुवैद्यकीय
दवाखन्यांना प्रमाणपत्र वितरण पदुममंत्री श्री जानकर यांच्या हस्ते आज करण्यात
आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.
वा.ए.पठाण,जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार,जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, डॉ. संदेश कचरे,बाबा देसाई आदि उपस्थित होते.
श्री. जानकर पुढे म्हणाले, अंडी उबवणी
केंद्र हे राज्यात अघाडीवर आले आहे. त्याबद्दल सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांचे विशेष
अभिनंदन. लवकरच रिक्त पदे भरली जातील. दररोज 1 कोटी 40 लाख रूपयांची अंडी तितकेच
दूध आणि मत्स्यबीज लागते. हे सर्व गुजरात,तेलंगणा,कर्नाटकमधून येते. त्यासाठी
राज्याचे दररोज 3 कोटी 20 लाख रूपये खर्ची पडतात. राज्याचे हे पैसे वाचवण्यासाठी
महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवा. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जा शेतकऱ्यांना
तयार करा आणि राज्याचे उत्पन्न वाढवा, असेही ते म्हणाले.
यावेळी करवीर तालुक्यातील प्रयाग-चिखली,
भुयेवाडी, सांगवडे, इस्पुर्ली, सडोली खा., दिंडनेर्ली, चुये, खुपीरे, वडणगे, गडहिंग्लज
तालुक्यातील हरळी बु., हसुरचंपु, कौलगे, कडगाव, पन्हाळा तालुक्यातील कळे, आजरा
तालुक्यातील उत्तुर, भादवण, कागल तालुक्यातील कासारी, सिध्दनेर्ली, म्हाकवे, मुरगूड,
चंडगड तालुक्यातील चंदगड, हलगर्णी, शिरोळ तालुक्यातील शिरोळ, कुरूंदवाड, हातकणंगले
तालुक्यातील तळसंदे, वडगाव, हातकणंगले, हुपरी, रुकडी, शिरोली, राधानगरी
तालुक्यातील क.तारळे, क.वाळवे, राशिवडे, गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा, भुदरगड
तालुक्यातील गारगोटी, शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर, मांजरे,परळे निनाई या
पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.