कोल्हापूर,
दि. 26 : अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान
उंचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांनी आवश्यक
कागदपत्रांसह www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे
आवाहन कागल पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेमध्ये सन 2019-20 या वर्षात नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी रक्कम रुपये
2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्तीसाठी
घटकांसाठी 50 हजार, इनवेल बोअरिंग
(विहीरीत बोअर मारणे) रुपये 20 हजार, पंपसंचासाठी (इलेक्ट्रीक मोटर) रुपये 20
हजार, वीज जोडणी आकार रुपये 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रुपये 1 लाख
व सुक्ष्म खरेदी करण्यासाठी कृषी विभागाकडील विहित अनुदान मर्यादा व्यतिरिक्त ठिबक
सिंचन संचासाठी रुपये 50 हजार व तुषार सिंचन संचासाठी रुपये 25 हजार अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेत 7 बाबी असून लाभ पॅकेज
स्वरुपात देण्यात येणार आहे. योजनेसाठी विहित अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या
शेतकऱ्यास कोणत्याही एका पॅकेजचा लाभ घेता येईल. नवीन विहीर पॅकेज- नवीन विहीर,
पंपसंच, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन व आवश्कतेनुसार इनवेल बोअरिंग. जुनी विहीर
दुरुस्ती-जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व
आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज-ज्या अनुसूचित
जाती, नवबौध्द शेतकऱ्याने ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे त्या शेतकऱ्यास
या पॅकेजचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच,
वीजजोडणी, आकार व सुक्ष्म सिंचन संच आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहे.
ज्या
शेतकऱ्यांनी यापूर्वी विशेष घटक योजना अथवा शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून नवीन
विहीर अथवा जुनी विहीर दुरुस्तीचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्यांना 3 पॅकेजचा लाभ
घेता येणार नाही. सदर शेतकऱ्यांना आवश्यकता असल्यास पंपसंच, वीज जोडणी आकार व
सुक्ष्म संच या घटकांचा लाभ घेता येईल.
योजनेच्या
अटी याप्रमाणे-लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकरी असावा. शेतकऱ्याच्या नावे
जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे (नगरपंचायत, नगरपालिका व
महानगरपालिका क्षेत्राबाहेरील). शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे
प्रमाणपत्र असावे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर (1 एकर)
व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. सामुहिक शेतजमिन किमान 0.40 हेक्टर धारण
करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. ज्यांना
नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.20
क्षेत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थीकडे आधार कार्ड, बँक खाते असणे व सदर बँक खाते
आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्याचे सर्व
मार्गाची मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पर्यंतचा तहसिलदार यांचा दाखला व
ग्रामसभा ठराव.
ऑनलाईन
सादर केलेली प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रतीसह कृषि
अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांच्याकडे स्वहस्ते सादर करावी.
00 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.