कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) :
सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या महिलांनी 'संवादिनी' होऊन
महिलांसाठीच्या जनजागरण अभियानात सहभागी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क
विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
स्वयंस्फूर्तीने
समाजाप्रती काम करण्याची इच्छा असणाऱ्या 25 ते 50 वयोगटातील किमान 10 वी उत्तीर्ण
असणाऱ्या महाराष्ट्र निवासी महिला 'संवादिनी' बनू शकतात.
या
करिता सामाजिक समस्यांची किमान मूलभूत माहिती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची आवड
अपेक्षित असून 'संवादिनी' होऊ इच्छिणाऱ्या महिलांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी
संबंध नसला पाहिजे.
प्रत्येक
तालुक्यातून सुमारे 50 या प्रमाणे एका जिल्ह्यात साधारणत: 500 महिला अशा एकूण
राज्यात 18 हजार महिलांची 'संवादिनी' ची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या 'संवादिनी'
नी त्यांच्या भागातील वैद्यकीय व्यावसायिक, वकील, प्राचार्य, शिक्षक, सामाजिक
कार्यकर्ते, उद्योजक, अंगणवाडी सेविका व इतर समाज घटकातील महिलांची प्रत्यक्ष भेट
घेऊन त्यांना संवादिनी पुस्तिका देऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या महिलांना
शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे अपेक्षित आहे.
संवादिनी
होण्यासाठी पुणे विभागासाठी 9324924108 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच इतर
विभागाचे संपर्क क्रमांक याप्रमाणे- मुंबई 9324924101, कोकण 9324924105, नाशिक-
9324924104, पश्चिम महाराष्ट्र 9324924109, मराठवाडा 9324924106, अमरावती
9324924103 व नागपूर 9324924110
0 0 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.