शनिवार, २० जुलै, २०१९

सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज करावेत



कोल्हापूर,दि.20 (जि.मा.का.) :सैन्य तथा सशस्त्र दलातील वीरमरण आलेल्या महाराष्ट्र राज्याचे अधिवाशी असणाऱ्या शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व कायदेशीर वारस यांना दोन हेक्टर शेतीयोग्य सरकारी जमिनी वाटप  करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी कळविले आहे. .
       वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व  कायदेशीर वारस (ज्यांनी अद्याप सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज सादर केले नाहीत) त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार कार्ड, स्वत:चा मोबाईल नंबर, डिसचार्ज पुस्तक, ओळख पत्र, पी. पी. ओ. ची छायांकित प्रत घेऊन यावे.
          अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0321-2665812 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
00000
           



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.