कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणमार्फत श्री दत्ता बाळ मिशन डिव्हाईन येथे अंमली पदार्थ
निर्मूलन शिबीर संपन्न झाले.
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) अर्चना गरड या प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना बाल गुन्हेगारी तसेच मुलांवरील
लैंगिक शोषणाविरुध्द कायदेशीर मार्गाने लढले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी
शिक्षण संकुलातील मुलांना देश स्वातंत्र्याच्या दिवसापासून ते थोर व्यक्तींच्या
आठवणींना मुलांमधून प्रश्नोत्तराने उजाळा दिला. त्यांनी दुर्बल शोषित घटकांवर
अन्यया होऊ नये. त्यांना योग्य तो न्याय मिळावा याकरिता पीडितांना मदत करण्यासाठी
विधी सेवा प्राधिकरण नेहमीच कटीबध्द असल्याचे सांगितले. पीडित व्यक्तींना अंमली
पदार्थापासून व्यसन मुक्त करण्याच्या योजनाही विधी सेवा प्राधिकरण राबवत असल्याचे म्हणाले.
संस्थेच्या अध्यक्ष पल्लवी देसाई सचिव
निलेश देसाई यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन प्रगती कोरडे यांनी
केले तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिक्षक वीणा कट्टी यांनी
केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.