कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील जे सैनिक नौसेनेतून (नेव्ही) 10 वर्षे
किंवा त्यापेक्षा जास्त सेवा करुन निवृत्त झाले आहेत व ज्यांना निवृत्ती वेतन मिळत
नाही अशा सर्व माजी सैनिकांनी तसेच त्यांच्या अवलंबितांनी निवृत्ती वेतन अर्ज जमा करावेत
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर
सुभाष सासने यांनी केले आहे.
नेट कॅफेमधून
navpen-navy@nic.in या ई- मेलवरुन निवृत्ती वेतनचे अर्ज उपलब्ध आहेत. त्यामध्ये दिलेल्या
माहितीनुसार अर्ज पूर्ण करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे प्रत्यक्ष येऊन जमा
करावेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.