बुधवार, १७ जुलै, २०१९

शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत



   कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : माजी सैनिकांचे पाल्य इयत्ता 10 वी, 12 वी तसेच डिप्लोमा अथवा पदवी परीक्षेत कमीत-कमी 60 टक्के गुण मिळवून 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत,अश पाल्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत.
        एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशिरा मिळाल्यास प्रवेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ज्या पाल्यांनी सीईटी अथवा जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा प्रकरणामध्ये अर्जासोबत गॅप सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.
          जास्तीत-जास्त माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांनी याचा फायदा घ्यावा. आवश्यक कागदपत्रे व अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0231-2665812 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले आहे.  
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.