मंगळवार, ९ जुलै, २०१९

उत्कृष्ठ कार्याबद्दल डाक विभाग सात पुरस्कार



        कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये उत्कृष्ठ कार्याबद्दल कोल्हापूर डाक विभागास सात पुरस्कार मिळाल्याची माहिती कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
             सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये  देण्यात आलेल्या या पुरस्कारामध्ये आयपीपीबी ची नवीन खाती उघडण्यामध्ये देश पातळीवर प्रथम क्रमांक, पोस्ट ऑफिस बचत खाते उघडणे, आयपीपीबी बचत खाते उघडणे, आयपीपीबी नवीन बचत खाते उघडणे व त्या खाती पोस्ट ऑफिस बचत खात्यास संलग्न करणे, आधार नवीन नोंदणी व अपडेशन, दर्पणमधील व्यवहार, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या कार्याबद्दल प्रथम क्रमांक व संपुर्ण विमा ग्राम व सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत ग्रामीण डाक जीवन विम्याच्या कार्याबद्दल व्दितीय क्रमांकाच्या पुरस्काराचा समावेश आहे.
            पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील सर्व विभागीय कार्यालयाच्या कार्य प्रमुखांच्या बैठकीत सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील विभागीय कार्यप्रमुखांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांच्या हस्ते पारितो‍षिके व प्रशस्तीपत्रके  देऊन गौरविण्यात आले.
             
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.