नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थेची आज बैठक
कोल्हापूर,
दि. 15 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेकडील जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व
मजूर सहकारी संस्थेच्या काम वाटप समितीची बैठक मंगळवार दि. 16 जुलै रोजी दुपारी 12
वाजता व सुशिक्षित बेरोजगार स्थापत्ये अभियंते यांची बैठक दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद
जुने सभागृह कागलकर हाऊस येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित
बेरोजगार स्थापत्ये अभियंते यांनी तसेच ज्याच्या नावे सुबेअ व मजूर संस्थानचे नोंदणी
आहे त्यांनी आपल्या पासबुकासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी
अभियंता यांनी केले आहे.
0000
खरीप पीक हंगाम
कोल्हापूर,
दि. 15 (जि.मा.का.) : खरीप हंगामातील मुख्य पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र
2 लाख 53 हजार 057 हेक्टर क्षेत्र असून, ऊस पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 42 हजार
336 हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात पेरणीची कामे सुरु झाली असून, 11 लाख 7 हजार
970 एवढ्या क्षेत्रावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.
भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 10 हजार
537 इतके क्षेत्र असून, जिल्ह्यात तालुक्यामध्ये भात पिकाची धुळवाफ पेरणी झाली आहे.
भात पिकाची 52 हजार 773 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रोप लागणीची कामे सुरु झाली
असून, धुळवाफ व पेर भात क्षेत्रात आंतरमशागत व कोळपणीची कामे सुरु झाली आहेत.
नाचणी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 2 लाख 1 हजार
556 हेक्टर इतके आहे. या क्षेत्रावर नाचणी पिकाची पेरणी व रोपवाटीका तयार करण्यात आली
असून, रोपलागणीची कामे सुरु झाली आहेत.
भुईमूग पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 50 हजार 901
हेक्टर असून, या क्षेत्रात पिकांची पेरणी झाली असून, पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये आंतरमशागतीची कामे सुरु करण्यात
आली आहेत.
सोयाबीन पिकामध्ये सर्वसाधारण क्षेत्र
53 हजार 415 हेक्टर असून, 29 हजार 796 हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. तर
पेरणी झालेल्या आंतरमशागतीमध्ये कामे सुरु करण्यात आली आहेत.
ऊस पिकाखाली 1 लाख 42 हजार 336 हेक्टर
क्षेत्र असून, शाश्वत पाण्याच्या ठिकाणी सुरु हंगामी ऊसामध्ये मोठया बांधणीची कामे सुरु झाली असून, खते
व आंतरमशागतीची कामे करण्यात येत आहेत.
0000
इचलकरंजी नगरपालिकेतर्फे वृक्षारोपन
कोल्हापूर,
दि. 15 (जि.मा.का.) : इचलकरंजी नगरपरिषद व राजर्षी शाहू हायस्कूल यांच्या
संयुक्त विद्यमाने गणवेश, रोपे व वृक्षारोपण वाटप कार्यक्रम आमदार सुरेश हळवणकर, वन
विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व इचलकरंजी मतदार संघाचे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र
हातकणंगले यांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या वनमहोत्सव निमित्त रोपे आपल्यादारी या स्टॉलचे
उद्घाटन श्री. खारगे यांच्या हस्ते करण्यात आले.
लक्ष्मी
को.ऑफरेटिव्ह प्रोसेसर लि. इचलकरंजी येथील कामगारांना रोपे वाटण्यात आले. डॉ. सायरस
पुनावाला इंन्टरनॅशनल स्कूल पेठवडगाव व स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान पेठवडगाव
येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी
आमदार डॉ. सुचित मिणचेकर, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले,
उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वनसंरक्षक
रंगनाथ नायकडे, उपवनसंरक्षक हणुमंत धूमाळ, सावंतवाडीचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण,
विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सुहास साळोखे, राजन देसाई, विजय गोसावी,
वनक्षेत्रपाल, वनपाल, वनसंरक्षक व वनमजूर आदी उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.