मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रम सुरु
कोल्हापूर,
दि. 23 (जि.मा.का.) : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
दि. 1 जानेवारी 2019 ही आर्हताकारी तारीख निश्चित करण्यात आली असून, मतदार यादीचा दुसरा
विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार 271-चंदगड
विधानसभा मतदारसंघाची प्रारुप यादी दि. 15 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, दावे
किंवा हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 15 ते 30 जुलै पर्यंत राहणार आहे.
निवडणूक आयोगाच्या
सूचनेनुसार दि. 27 व 28 जुलै रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले
आहे. 271-चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व 376 मतदान केंद्रावर बी.एल.ओ. उपस्थित राहणार
असून, त्यामध्ये 1 जानेवारी 2019 या अर्हताकरी तारीखेला 18 वर्षे पूर्ण करीत असलेल्या
मतदारांकडून नोंदणीसाठी नमुना क्र. 6 चा अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तर नमुना क्र.
7 चा अर्ज नाव वगळण्यासाठी आहे. मयत, दुबार मतदारांची नावे वगळणे, दुरुस्ती करणे आदी
कामे करण्यात येणार आहे. योग्य ते पुरावे बी.एल.ओ.
कडे सादर करुन, मतदारांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांनी केले आहे.
0000
माजी सैनिकांच्या पत्नी व पाल्यांच्या नावात,
जन्मतारीखेत बदल असल्यास दुरुस्ती होणार
कोल्हापूर,
दि. 23 (जि.मा.का.) : सैन्यात कार्यरत असताना काही माजी सैनिकांच्या
पत्नी व मुलांची नावे त्यांच्या अभिलेख कार्यालयात नमूद नाहीत. ज्यांची नावे व जन्मतारीख
शालेय कागदपत्राप्रमाणे नाहीत. त्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील पत्नी व पाल्यांची
कागदपत्रे दुरुस्ती करुन मिळणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने
यांनी केले आहे.
माजी
सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक व इतर लाभांपासून वंचित रहावे लागत असल्यामुळे. जिल्ह्यातील
सर्व माजी सैनिकांनी त्यांना निवृत्तीच्या वेळी देण्यात आलेल्या डिस्चार्ड बुक व पी.पी.ओ.
या अभिलेखाची पडताळणी करुन, कागदपत्राप्रमाणे नाव व जन्मतारीख नसल्यास, ती अभिलेख कार्यालयाकडे
पाठविण्यात येणार आहे.
भविष्यात माजी सैनिकांच्या पत्नी व पाल्यांना काही अडचण येऊ नये म्हणून ही अभिलेख
नोंदणी करण्यात येणार असून, अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क
साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
वनहक्कधारकांची वैयक्तिक माहिती
ग्रामपंचायतींकडे द्यावी
कोल्हापूर,
दि. 23 (जि.मा.का.) : 1 जानेवारी
2018 पासून अंमलात आलेल्या अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम-2006,
नियम-2008 व सुधारीत नियम-2012 नुसार अनुसूचित जमातीच्या किंवा इतर पारंपारिक वन निवासी
व्यक्ती, त्यांचे समूह पारंपारिक पद्धतीने
वन विभागाच्या जमिनीवर, वनौपजावर अवलंबून आहेत त्यांना वाहिवाटीखालील हक्क कायम
देण्यात येणार आहे. याच अधिनियमांतर्गत नियम-16 नुसार पर्यावरण आणि वन, महसूल, ग्रामविकास
व इतर उपजेवीकेशी संबंधित उपाययोजनांचे फायदे पुरविण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय
वनहक्कधारकांनी त्यांची वैयक्तिक माहिती संकलीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील
वन हक्कधारकांनी त्यांची माहिती आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुक त्यांच्या गावामधसील
ग्रामपंचायतीमध्ये संगणकामध्ये स्कॅनिंग करुन अपलोड करावे. ग्रामपंचायतीने प्रत्येक
दावेदारांची स्कॅनिंग फाईल स्वतंत्रपणे करावी. दावेधारकांचे नाव व वन हक्काचा प्रकार
(शेती किंवा घर), भ्रमणध्वनी क्रमांक, आधारकार्ड, बँक खातेधाराचे नाव, बँकेचे नाव,
शाखा, बँक खाते प्रकार, बँकेचा सांकेताक क्रमांक, आयएफसी क्रमांक, मायकर क्रमांक, पॅनकार्ड
क्रमांक आदी माहिती भरण्यात यावी संबंधित ग्रामसेवकांनी सदर माहिती उपविभाग स्तरीय
समितीकडे सॉफ्ट व हार्ड कॉपी देण्यात यावी. कोणताही वनहक्कधारक या माहितीपासून वंचित
राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीने घ्यावयाची आहे.
उपविभाग स्तरीय समितीने त्यांच्या उपविभागातील
माहिती तात्काळ संकलित करुन जिल्हा स्तरावर पुरविण्यात यावी. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयातील 0231-2654812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.