कोल्हापूर,दि.
23 (जि.मा.का.): टाकवडे वेस येथील गळती लागलेल्या खराब दाबनलिकेचा भाग नव्याने
बसवून इचलकरंजी नगरपरिषदेमार्फत पंपिंग पुनश्च सुरु करण्यात आले असल्याची माहिती
नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी दिली.
इचलकरंजी नगरपरिषद पाणी पुरवठा
योजने अंतर्गत भुयारी गटार योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. या योजनेंतर्गत
टाकवडे वेस येथे ड्रेनेज पंप व पंप हाऊस उभारण्यात आले आहे. या ठिकाणी शहरातील
सांडपाणी एकत्रित करुन 200 एचपी पंपाद्वारे उपसा करुन 750 मिमी व्यासाच्या
दाबनलिकेद्वारे 20 द.ल.ली. क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्राकडे पुढील प्रक्रियेसाठी
पाठविले जाते.
पंप हाऊसमधून
बाहेर पडणाऱ्या दाबनलिकेला शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास गळती लागली.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर पडू लागल्यामुळे पंपिंग बंद करण्यात आले.
या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व उप
प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आली. दाबनलिकेची गळती काढेपर्यंत शहरातील
सांडपाणी नैसर्गिक उताराने टाकवडे वेस येथील पंप हाऊस मध्ये येणे चालू होते. येणारे
शहरातील सांडपाणी थांबविणे शक्य नसल्याने दरम्यानच्या कालावधीत हे सांडपाणी कमी
जास्त प्रमाणात काळ्या ओढ्यात मिळसले. खबरदारीचा उपाय म्हणून काळ्या ओढ्यातील
पाण्यावर ब्लिचिंग डोसिंग करण्यात आले.
गळती
लागलेल्या दाबनलिकेच्या ठिकाणी नगरपरिषदेमार्फत युध्द पातळीवर खुदाई करुन खराब
झालेला भाग काढून टाकण्यात आला व वेल्डींग करुन नवीन भाग बसविण्यात आला. काल
सोमवारपासून पंपिंग पुन्हा सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी श्री.
पाटील यांनी प्रसिध्दीपत्रिकाद्वारे दिली आहे.
0 0 0 0 0 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.