कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : ग्रामीण विकास
मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या समन्वयाने जिल्ह्यामधील ग्रामीण
भागातील बेरोजगार युवक/युवती तसेच बचत गटाच्या महिलांसाठी बँक ऑफ इंडिया स्टार
स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यावेळी बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनचे
प्रबंधक सुभाष फडते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिला अधिकाधिक कणखर
असतात, त्यांनी ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता बेरोजगारीवर मात करण्यासाठी
स्वयंरोजगाराची कास धरावी. आपल्या कुटुंबाची उन्नती साधत पर्यायाने देशाच्या
विकासात हातभार लावावा. आपल्या अंगी असलेल्या
कलागुणांचा उपयोग करून छोटे-मोठे व्यवसाय सुरु करावेत. जिल्ह्यात बँक ऑफ
इंडिया व स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) तर्फे मंळळवार दिनांक 9
जुलै रोजी 30 दिवसांच्या ब्युटी पार्लर व्यवस्थापन प्रशिक्षणाची बॅच क्र. 170 ची सांगता
झाली, त्यावेळी श्री. फडते बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी 34 प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी स्टार
स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) केंद्राच्या संचालीका सोनाली माने, तांत्रिक प्रशिक्षिका वीणा रेळेकर
आणि आरसेटी केंद्रचे कर्मचारी बाजीराव पाटील,
मदन पाटील, अनिल कांबळे व विष्णू मांगोरे आदी उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.