माजी सैनिक व त्यांच्या विधवांना
मालमत्ता करात सूट
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : सैन्य तथा सशत्र दलातील शौर्य पदकधारक व माजी सैनिकांच्या विधवांना
मालमत्ता करातून सूट देण्याबाबत तरतुद केली आहे. अशा लाभार्थ्यांनी त्याबाबतचे प्रमाणपत्र
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडून घेण्यात यावे. कराबाबतचे प्रमाणपत्र मिळल्यानंतर
ते ग्रामपंचायत, नगरपरीषद, नगरपालिका यांच्याकडे जमा करावे.
जिल्ह्यातील
सुमारे 5 हजार 276 माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी आहेत. माजी सैनिकांच्या
विधवांनी अद्याप याबाबतचे प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय
यांच्याकडे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार कार्ड, स्वत:च्या मालमत्तेचा सातबारा
उतारा, माजी सैनिक विधवा ओळख पत्र आदी कागदपत्रे घेवून यावीत. असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी, मेजर सुभाष सासने यांनी
केले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील 302 माजी
सैनिक विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाने दिले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथील 0231-2665812या दुरध्वनी क्रमांकवर
संपर्क करावा.
00000
शिष्यवृत्ती
योजना
माजी सैनिक पाल्यांना
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना
कोल्हापूर, दि. 16
(जिमाका) : KSB केद्रींय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून दर वर्षी व्यावसायिक शिक्षण
घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान
शिष्यवृत्ती (PMSS) योजने अंतर्गत
मुलींना 27 हजार तर मुलांना 24 हजार आर्थिक मदत शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाते.
माजी सैनिकांच्या पाल्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर ऑनलाईन
पध्दतीने पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यात यावे. यासाठी इयत्ता 12 वी
किंवा डिप्लोमा यामध्ये 60% पेक्षा जास्त गुण
असणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज ksb.gov.in या संकेतस्थळावर भरुन तो
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावा. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त माजी
सैनिकांच्या पाल्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी मेजर
सुभाष सासने यांनी केले आहे
00000
सामाजिक वनीकरण
विभागामार्फत वृक्षारोपन
कोल्हापूर,
दि. 15 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्षारोपन योजनेअंतर्गंत
सामाजिक वनीकरण विभागने कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आला.
या वृक्ष
लागवड कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी दिपक
खाडे, साताऱ्याचे विभागीय वन अधिकारी सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक सुहास साळोखे, राजन
देसाई, विजय गोसावी, वनक्षेत्रपाल निकेत शिंदे, वनपाल, मुख्यलेखापाल, वनसंरक्षक व वनमजूर
आदी उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.