शुक्रवार, १२ जुलै, २०१९

सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षलागवड कार्यक्रमात साजरा / 15 जुलै रोजी महिला लोकशाही दिन


सामाजिक वनीकरण विभागामार्फत
वृक्षलागवड कार्यक्रमात साजरा
कोल्हापूर,दि. 12 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी 50 कोटी वृक्ष लागवड अभियानामध्ये सन 2016 मध्ये 2 कोटी, सन 2017 मध्ये 4 कोटी, यंदाच्या वर्षी 13 कोटी व पुढील वर्षी 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात जिल्हा अग्रेसमध्ये आहे.
           सन 2019-20 करीता 33 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, या उदिष्टपूर्ततेच्या अनुषंगाने 11 जुलै रोजी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण या कार्यालयाने कार्यालयातील परीसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, माजी विभागीय वन अधिकारी टी. पी. पाटील, सहायक वनसरंक्षक सुहास साळोखे, सहायक वनसरंक्षक राजन देसाई, वनक्षेत्रपाल निकेत शिंदे, मुख्यलेखापाल देवदास खडके यांच्याहस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आला.
            तसेच या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी, वनक्षेत्रपाल आदी कर्मचारी उपस्थित होते. ''हिरत ज्योत तेजोमय देई भविष्य निरामय'' हे घोषवाक्यही म्हणण्यात आले.
00000

                                                                        महिला लोकशाही दिन

15 जुलै रोजी  
महिला लोकशाही दिन
कोल्हापूर,दि. 12 (जि.मा.का.) : महिला व बाल विकास विभागामार्फत माहे जुलै 2019 रोजीचे 'महिला लोकशाही दिन' सोमवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात येथे आयोजित करण्यात आले आहे.
             या महिला लोकशाही दिनात पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे असे आवाहन बी.जी. काटकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. 
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.