मंगळवार, २ जुलै, २०१९

हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन



       
            कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवा यांनी आपल्या हयातीचे दाखले जमा केले नाहीत, अशांनी 15 जुलै पर्यंत जमा करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले आहे.
             1 एप्रिल  ते 31 ऑगस्ट 2018 या पाच महिन्याचा फरक वाटप करण्यासाठी आपल्या हयातीचे दाखले ग्रामसेवक/ नगरसेवक अथवा बँकेकडून स्वाक्षरी घेवून सोबत या कार्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या  व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत मोबाईल क्रमांकासह कार्यालयात जमा करावी. तसेच जे दुसरे महायुध्द अनुदान लाभार्थी मयत झालेले आहेत, त्यांच्या मृत्यूचे दाखले त्यांच्या नातेवाईकांनी कार्यालयात जमा करावेत. जेणेकरुन त्यांचे दिनांक 1 एप्रिल 2018 पासून मयत तारखेपर्यंतचे वाढीव अनुदान फरक त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सोपे होईल. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या मृत्यूच्या दाखल्याचा वाढीव अनुदान देण्याकरिता विचार केला जाणार नाही.
             तसेच दुसऱ्या महायुध्दातील हयात असणाऱ्या माजी सैनिक / विधवा यांचे हयातीचे दाखले वर दिलेल्या कालावधीत जमा न केल्यास अशा लाभार्थींचे दुसरे महायुध्द अनुदान माहे जुलै 2019 या महिन्यापासून बंद करण्यात येईल. दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे दाखले सादर न केल्यामुळे आपले अनुदान बंद झाल्यास आपण स्वत: जबाबदार रहाल यांची नोंद घ्यावी, असेही श्री. सासने यांनी म्हटले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.