शनिवार, ६ जुलै, २०१९

अंत्योदय कार्डधारकांसाठी जुलै ते सप्टेंबर साखर नियतन



        कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) :अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै ते सप्टेंबर  साठीचे 1 किलोप्रमाणे  प्रती किलो 20 रुपये दराने साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे यांनी दिली.
          जुलै महिन्यासाठी -लिलाव टेंडर पध्दतीने 530.30 क्विंटल साखरेचे प्रमाण मंजूर करण्यात आले असून, जिल्ह्यातील  सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
          जिल्ह्यातील 14 गोदामांना साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले असून शासकीय गोदामनिहाय मंजूर नियतन क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. 
          रमणमळा (करवीर तालुका) - 13.68 क्विंटल, रमणमळा (कोल्हापूर शहर)- 30.91, पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा 35.91, हातकणंगले- 49.92, इचलकरंजी 48.05, जयसिंगपूर (ता. शिरोळ )- 46.42, कागल 40.91,  शाहूवाडी - 32.32, गगनबावडा - 8.79, भूदरगड -27.80, गडहिंग्लज - 57.68, आजरा-  34.84, चंदगड - 60.09 व राधानगरी - 42.98 क्विंटल आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.