माजी सैनिकांसाठी कल्याण संघटक दौरा
कोल्हापूर,
दि. 24 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांचे
प्रश्न सोडविण्यासाठी, कल्याण व पुनर्वसनबाबत आदी योजना व माहिती देण्यासाठी जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाचा माहे-ऑगस्ट 2019 रोजीचा कल्याण संघटक दौरा पुढीलप्रमाणे आयोजित
करण्यात आला आहे.
गुरुवार दि.
1 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय कागल, मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय राधानगरी,
बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय गडहिंग्लज, गुरुवार दि. 8 ऑगस्ट रोजी माजी
सैनिक संघटना टाकळी ता. शिरोळ, शुक्रवार दि. 9 ऑगस्ट रोजी माजी सैनिक संघटना गिरगाव
ता. करवीर, मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय चंदगड, शुक्रवार दि. 16 ऑगस्ट
रोजी तहसिल कार्यालय आजरा, मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय हातकणंगले, बुधवार
दि. 21 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय भुदरगड, गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी माजी सैनिक संघटना
कोवाड ता. चंदगड, शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय पन्हाळा, मंगळवार दि.
27 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय शिरोळ या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत माजी
सैनिकांच्या कल्याणासाठी कामकाज करण्यात येणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
सैनिक कल्याण निधीतून माजी
सैनिकाला
स्वयंरोजगारासाठी 3 लाखाची आर्थिक मदत
कोल्हापूर,
दि. 24 (जि.मा.का.) : सैनिक कल्याण निधीतून माजी सैनिक अब्दुल गुलाब नायकवडी रहाणार कसबा तारळे, ता.राधानगरी यांना स्वयंरोजगारासाठी
3 लाखाची आर्थिक मदत देण्यात आली.
जिल्हयातील
इच्छुक माजी
सैनिक जे बेरोजगार, शासकीय-निमशासकीय सेवेत नाहीत, ज्यांचे
वय 58 वर्षाखाली आहे, अशा माजी
सैनिकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत
भेटावे. स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या
आवश्यक कागदपत्रांची चौकशी व पूर्तता करुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सुभाष सासने यांनी केले आहे.
0000
सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत
कोल्हापूर,
दि. 24 (जि.मा.का.) : ज्येष्ठ नागरीक सेवा संघ तपोवन परिसर यांच्यावतीने
शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. याबाबतचा धनादेश ज्येष्ठ नागरिक
सेवा संघाचे अध्यक्ष शंकरराव भोला यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांच्याकडे
सुपूर्त केला.
जिल्ह्यातील अधिकाधिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी
म्हणून या सैनिक कल्याण निधीला सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी श्री. सासने यांनी केले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.