कोल्हापूर, दि .26
(जि.मा.का) : सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व अंमलबजावणी नियमांत कालानुरूप सुधारणा
करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमात सुधारणा करावयाची आहे. ग्रंथालय चळवळीशी संबंधित
लेखक,साहित्यिक यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपल्या सूचना, अभिप्राय जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालयांना द्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 सुधारणा
समितीचे अध्यक्ष सुभाष राठोड यांनी केले आहे.
लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक,
मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य सार्वजनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक,
वाचक व सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला,
महाविद्यालय, विद्यापीठीय ग्रंथालय व माहिती शास्त्राचे प्राध्यापक, संचालनालयातील
अधिकारी व कर्मचारी वर्ग आदींनी प्रस्तावित अधिनियम व नियमांत सुधारणा,बदल सुचविताना
बाब निहाय सकारण व योग्य समर्थन करणे आवश्यक आहे.
ज्यांना
सुधारणा,अभिप्राय, मत, सूचना विषयक पत्रव्यवहार करावयाचा आहे त्यांनी समक्ष, टपाल किंवा
ई-मेलव्दारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना सादर करावा. याबाबतचा संपूर्ण तपशिल ग्रंथालय
संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.