सामाजिक वनीकरणतर्फे वृक्ष वाढदिवस
कोल्हापूर,
दि. 20 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी 50 कोटी वृक्ष
लागवड अभियानात सन 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत सामाजिक वनिकरण
मौजे जाखले तालुका पन्हाळा येथील वृक्ष लागवडीस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्धल वृक्षांचा
वाढ दिवस साजरा करण्यात आला.
एक वर्ष झालेल्या वृक्षामध्ये जांभळ, निलमोहर, पिवळा चाफा, बिटसा, वड, बकुळ,
आवळा, करंज, अर्जन, गुळभेडी, महोगणी, फणस, कांचन, पांढरीसावर, लिंब, बांबू, रिटा, बेहडा
व आंबा आदी 42 प्रजातीच्या वृक्षांची लागवड केलेल्या वृक्षांना गांडूळ खत देवून वृक्षांचा
वाढ दिवस साजरा केला. गेल्या वर्षी 10 हजार वृक्षलागवड केलेल्या वृक्षांपैकी 80 टक्के
वृक्ष जिवंत असून, यावर्षी पुन्हा वृक्षरोपांची मरअळी भरण्याचे काम केले आहे.
या कार्यक्रमास जाखले गावचे सरपंच एस.ए.माने,
पंचायत समिती सदस्य श्रीमती टी. आर. शिंदे, वनक्षेत्रपाल एस.एस.बिराजदार, हरित सेवा
ट्रस्टच्या श्रीमती सु.प. पाटील राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोकराव
देशमुख व सामाजिक वनकरण पन्हाळा कार्यालयाचे कर्मचारी/ अधिकारी, कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी
आदी उपस्थित होते.
000
छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेसाठी समिती गठीत
कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेच्या तक्रारींचे
निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीमध्ये तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी
संस्था हे अध्यक्ष असतील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका प्रतिनिधी-सदस्य,
अग्रणी बँक तालुका प्रतिनिधी-सदस्य, लेखा परिक्षक-सदस्य व सहकार अधिकारी ग्रेड-1 हे
सदस्य सचिव असणार आहेत. या समितीने शासनाकडून व शेतकऱ्यांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींचे
निवारण करावे, त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.
या योजनेच्या तक्रारीसाठी समिती प्रत्येक सोमवारी
व गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सभा
घेतली जाणार आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-2017 या योजनेबाबत शेतकऱ्यांच्या
काही तक्रारी असल्यास, त्यांनी संबंधित तालुक्याचे उप/ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.
0000
26 जुलै रोजी 20 वा कारगिल विजय दिन
कोल्हापूर,
दि. 20 (जि.मा.का.) : देशाच्या तिन्ही सेनादलातील अनेक शूर जवानांनी
मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणार्पन केले. त्या शहीद जवानांना मानवंदना करण्यासाठी
सैनिक दरबार हॉल कसबा बावडा येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता 20 वा कारगिल
विजय दिवस व शहिदांना मानवंदना देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व सैनिक दरबार
हॉल यांच्या संयुक्तरित्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, युद्ध
विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिकांच्या संघटनानी सैनिक दरबार हॉल कसबा बावडा येथे
उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.