कोल्हापूर,
दि. 25 : देशभरात 26 जुलै हा दिवस कारगिल
विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कारगिल विजय दिना निमित्त महाविद्यालयीन
विद्यार्थी व विद्यार्थीनींना ऊरी- द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा जिल्ह्यातील 25
सिनेमागृहांमध्ये मोफत दाखविण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय
शिंदे यांनी कळविले आहे.
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील
युवकांमध्ये सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृंध्दीगत व्हावा म्हणून
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनींना मोफत
ऊरी- द सर्जिकल स्ट्राईक हा
चित्रपट दिनांक 26 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता दाखविण्यात येणार आहे.
24
सिनेमागृहांमध्ये प्रत्येक 10 आसने ही सैनिक व माजी सैनिकांसाठी आरक्षित करण्यात
आली असून मोफत प्रवेशिका जिल्हा सैनिक अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे उपलब्ध
आहेत. मराठा समाज वसतीगृहामध्ये एकूण 62
विद्यार्थी संख्या असून त्यांच्यासाठी 62 प्रवेशिका आरक्षित करण्यात आल्या आहेत.
पत्रकार संघातील पत्रकारांना प्रत्येक सिनेमागृहात 2 आसने आरक्षित केली असून
त्याबाबतचे प्रवेशिका पत्रकास संघाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
शिवाजी
विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या या
महत्वकांक्षी योजनेबाबत माहिती व्हावी तसेच त्याबाबत प्रसिध्दी व्हावी यासाठी
शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या
शाखेतील विद्यार्थ्यांना 40 प्रवेशिका वितरण करुन त्याबाबतची व्यवस्था रॉयल
सिनेमागृहामध्ये करण्यात आली असल्याचेही अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी
कळविले आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.