कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : सैन्य तथा सशत्र दलातील शौर्यपदकधारक व माजी सैनिकांच्या विधवांना
मालमत्ता करातून सुट देण्याबाबत तरतूद केली आहे. अशा लाभार्थ्यांनी त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून घेऊन ग्रामपंचायत, नगर
परिषद, नगरपालिका येथे जमा करावे, असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
जिल्हयातील सर्व माजी सैनिक विधवा पत्नी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. ज्या माजी सैनिक विधवांनी अद्याप हे
प्रमाणपत्र घेतले नाही त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार रोड, कसबा बावडा येथे येऊन
अर्ज सादर करावा. येताना आधार कार्ड, स्वत:च्या मालमत्तेचा सातबारा उतारा,
माजी सैनिक विधवा ओळख पत्र घेवून यावे.
आजरा तालुक्यातील 17
माजी सैनिक विधवांना मालमत्ता
करातून सुट देण्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष
सासने यांनी प्रदान केले तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय दूरध्वनी क्र.
0231- 2665812 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.