कोल्हापूर,दि.
19 (जि.मा.का.) : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत
जिल्हा वार्षिक निधीच्या माध्यमातून झालेल्या कामांचा परिणाम दिसला पाहिजे.
त्यासाठी आराखडे, तांत्रिक मान्यता वेळेत घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत
दादा पाटील यांनी दिल्या.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची
बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगर पालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, समाज कल्याण
सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांच्यासह
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक नगरपालिकेचा खर्च
झालेल्या निधीचा आढावा घेऊन, पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले सामाजिक न्याय
विभागाने जिल्हा परिषदेला दिलेल्या निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने मान्यता
व्हावी. प्रत्येकाने वेळेत कामे पूर्ण करा, डिसेंबरमध्ये विनियोजनामध्ये मागेल
त्याला निधी मिळेल. निधी 100 टक्के खर्च व्हायला हवा प्रत्येक कामाचे थर्ड पार्टी
ऑडिट झाले पाहिजे, असेही शेवटी ते म्हणाले. यावर नगरपालिकांचे ऑडिट होत असल्याची
माहिती श्री. कामत यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.