शनिवार, १३ जुलै, २०१९

श्रीक्षेत्र कुंथुगिरी पर्यटन विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करु - राज्यमंत्री सदाभाऊ खोत



            कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : श्रीक्षेत्र कुंथुगिरीच्या विकासासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावांना पर्यटन विकासाअंतर्गत शासन स्तरावर तातडीने मंजुरी देऊन  निधी उपलब्ध करुन दिला जाईल. असे कृषी, फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे सांगितले.
            श्रीक्षेत्र कुंथुगिरी आळते, ता. हातकणंगले येथे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत, श्रीक्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या वाढीव आराखड्याबाबतची बैठक ऐलाचार्य वीरनंदी भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार सुधाकर भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. सोनवणे आदी उपस्थित होते.
            श्रीक्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या वाढीव आराखड्यात आरसीसी पाण्याची टाकी फील्टर हाऊस अंतर्गत पाईपलाईन व पंपिंग स्टेशन, यात्रीकरुंसाठी भोजन शाळा, श्रीक्षेत्रामधील रस्ते काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसविणे, क्षेत्रासाठी कंपाऊंड वॉल बांधणे, हायमॅक्स पोल बसविणे, यात्री निवास, श्रीक्षेत्रासाठी प्रवेशव्दाराची उभारणी, विद्यार्थी वसतीगृह, शोभिवंत कारंजे, सांस्कृतिक भवन व भोजनालय इत्यादी सोयी व सुविधा करण्याचे प्रस्तावित आहे असे सांगून, राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, या श्रीक्षेत्रामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाचे कामही करण्यात येणार आहे यासाठी अंदाजे 25 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी पर्यटन विकासअंतर्गंत उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत अशा सूचना ही यांनी  शेवटी त्यांनी दिल्या.  
            या बैठकीस विविध विभागांचे विभागप्रमुख श्रीक्षेत्र कुंथुगिरीचे संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.