कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : प्रधानमंत्री पीक विमा
योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी दिनांक 29 जुलै पर्यंत
वाढविण्यात आली असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व
आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात
येत आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण
मिळण्यासाठी विहीत मुदतीपूर्वी नजिकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा
हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहिसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या
कार्यालयाशी तसेच बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.