कोल्हापूर,
दि. 8 (जिमाका) : ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक
विभागाने दक्ष राहून त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीची त्वरित निर्गती
करावी व ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय
शिंदे यांनी दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती
शाहूजी सभागृह संपन्न झाली बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर राणी ताटे
यांच्यासह ग्राहक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
परिषदेच्या पदाधिकारी यांनी मांडलेल्या महावितरण, अन्न
औषध प्रशासन, आरोग्य, आपले सरकार, मुद्रा लोन, शिक्षण, आरटीओ, रास्त भाव दुकान, महाराष्ट्र
परीवहन महामंडळ या विभागाकडील तक्रारीबाबत संबंधित विभागांनी याबाबत चौकशी करून
अहवाल सादर करण्याच्या सूचना शिंदे यांनी बैठकीत दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.