कोल्हापूर,दि.
21 (जि.मा.का.) : पूरबाधित गावातील 1 लाख 23 हजार 143 मतदारांना नवीन PVC छायाचित्र मतदार
ओळखपत्र निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून
देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई
यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये झालेल्या
अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमध्ये 375 गावे व 4 लाख
लोकसंख्या प्रभावीत झाली. बहुतांशी नागरीकांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे
घरातील महत्वाची कागदपत्रे, मतदार ओळखपत्रे खराब किंवा नष्ट झाली आहेत. या पुरबाधीत
गावातील 1,56,060 इतकी PVC छायाचित्र मतदार ओळखपत्र नव्याने छपाई करुन मिळण्याबाबत आयोगाला विनंती
करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने 1,23,143 इतकी PVC छायाचित्र मतदार ओळखपत्रे उपलब्ध
करुन दिली आहेत.
यामध्ये 275
करवीर विधानसभा मतदारसंघ - प्रयाग
चिखली, आंबेवाडी, आरे. 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ - निलेवाडी, चावरे,
इंगळी, जुने पारगांव, हालोंडी, भेडवडे, घुणकी, पटटणकोडोली. 279 इचलकरंजी विधानसभा
मतदारसंघ - चंदूर,इचलकरंजी. 280 शिरोळ
विधानसभा मतदारसंघ - कवठेसार, चिंचवाड, अर्जुनवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी,
शिरढोण,कुरुंदवाड नृसिंहवाडी, तेरवाड, बस्तवाड, अकिवाट, राजापूर, नवे दानवाड, जुने दानवाड, राजापूरवाडी, खिद्रापूर. सर्व PVC छायाचित्र मतदार ओळखपत्र संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयांना
वितरीत करण्यात आली आहेत.
संबंधित मतदारांनी आपल्या
PVC छायाचित्र मतदार ओळखपत्रासाठी आपल्या
तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) किंवा आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) यांच्याकडे संपर्क साधावा. याव्यतिरिक्त
इतर पूर बाधित मतदारांना PVC EPIC ओळखपत्र
हवे असेल तर त्यांनाही आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) किंवा
आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.