बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीचे नियमन



 गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीचे नियमन

            कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : 12 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक असल्यामुळे या गणपती उत्सवाच्या मिरवणूका सुरळीत व सुरक्षित पार पाडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता कोल्हापूर शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित पाडण्यासाठी रस्त्यांचा मार्ग बदण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये रहदारी नियमन संदर्भात असलेल्या अधिकारान्वये शहरामध्ये दि. 12 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाला मिळणारे पुढील मार्ग मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व खुले करण्याबाबतचे निर्देश जाहीनाम्याद्वारे देण्यात आले आहे.
        गणपती विसर्जणाचे मार्ग पुढीलप्रमाणे- प्रमुख मिरवणूक मार्ग क्र.1 पार्वती सिग्नल ते उमा टॉकीज ते सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौक ते टेंबे रोड. देवल क्लब ते मिरजकर तिकिट ते बिनखांगी गणेश मंदिर ते महाद्वार रोड ते पापाची तिकटी ते गंगावेश ते शुक्रवार गेट पोलिस चौकी ते पंचगंगा घाट रस्ता राहील. मार्ग क्र.2 व्हिनस चौक ते विल्सन पूल ते फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज ते आझाद चौक ते दूर्गा हॉटेल ते बिंदू चौक ते शिवाजी पूतळा ते पापाची तिकटी पुढे मार्ग 1 प्रमाणे राहील.  मार्ग क्र. 3 व्हिनस कॉर्नर ते कोंडा ओळ ते फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज पुढे मार्ग क्र. 1 व 2 प्रमाणे राहणार आहे. मार्ग क्र. 4 फोर्ड कॉर्नर ते आईसो माहाराज पुतळा ते पद्मा चौक ते बिंदू चौक ते ‍शिवाजी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चप्पल लाईन ते पापाची तिकटी वरुन पुढे मार्ग क्र. 1 किंवा मार्ग क्र. 8 प्रमाणे राहील. मार्ग क्र. 5 दुर्गा चौक ते बिंदू चौक ते शिवाजी रोड ते छत्रपती शिवाजी महारात पुतळा चौक ते पापाची तिकटी ते पुढे मार्ग क्र. 1 किंवा मार्ग क्र. 8 नुसार राहणार आहे. मार्ग क्र. 6 नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटी  ते पुढे मार्ग क्र. 1 प्रमाणे राहील. मार्ग क्र. 7 खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर ते पुढे मार्ग क्र. 1 नुसार राहणार आहे. मार्ग क्र. 8 पापाची तिकटी ते कुंभार गल्ली ते बुरुड गल्ली ते भगतसिंग मंडळ चौक ते जूना बुधवार तालीम चौक ते तोरस्कर चौक ते पंचगंगा घाट असा मार्ग राहील. मार्ग क्र. 9 ताराबाई रोड रंकाळा ते साकोली कॉर्नर ते तटाकडील तालीम ते महालक्ष्मी चौक पुढे मार्ग क्र. 1 प्रमाणे राहणार आहे.
            विसर्जन मिरवणूक अनुषंगाने देण्यात आले निर्देश मुख्य मिरवणुकीतील 21 फुटी गणपती गंगावेश सिग्नल चौक येथून रंकाळा एस.टी.स्टाँड मार्गे जावळाचा गणपती, खराडे कॉलेज, राजकपूर पुतळा, इराणी खण असे मार्गस्थ होतील. या प्रमाणे विसर्जन मार्ग असून या मार्गाला जोडणारे सर्व जोडरस्ते सायकलसह सर्व मोटार वाहनांना गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. जोड मार्गाने मिरवणुकीच्या मार्गावर कोणतेही मोटार वाहन येणार नाही.
            मिरवणूक पाहण्यास येणाऱ्या नागरिक व भाविकांचे पादचारी मार्ग - मिरणुकीचा मुख्य मार्ग बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी ते गंगावेश ते जामदार क्लब ते पंचगंगा घाट असा राहणार आहे. या मार्गाने मिरवणूका जात असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. या मार्गावर गर्दी होऊन अनुचित प्रकार घडू नये, सर्व भाविक लोकांना मिरवणूक पाहण्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने मिरवणुकीच्या मार्गाने जावे परंतु मिरवणूकीच्या विरुद्ध दिशेने लोकांनी येऊ नये.
            बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या दरम्यान महाद्वार रोडला ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी रोड, भेंडे गल्ली आदी मार्ग दोन्ही बाजूने येवून मिळतात. या मार्गाचे दोन्ही बाजूला बॅरेकेडीग करुन त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आले असून महाद्वार रोडवर मिरवणूकीच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी नागरिकांना मनाई करण्यात येत आहे. गंगावेश ते पापाची तिकटी या मार्गावर कै. संजयसिंह गायकवाड पूतळा ते गंगावेशकडे मिरवणुकीच्या विरुद्ध दिशेने येण्यास नागरिकांना मनाई करण्यात येत आहे.  पिशवीकर हॉस्पीटल ते कसबा गेट चौकी तसेच पुष्कराज तरुण मंडळ ते वणकुंद्रे भांडी दुकान हा मार्ग नागरिकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. गंगावेश ते पापाची तिकटी या मार्गावर मिरवणूकीच्या विरुद्ध दिशेने नागरिकांना येण्यास  मनाई करण्यात येत आहे. गंगावेश ते पिशवीकर हॉस्पीटल ते बाबूजमाल दर्गा मार्गे जोतिबा रोड, ताराबाई रोड या मार्गाचा अवलंब करण्यात यावा. जोतिबा रोडवरील बाबूजमाल चौक ते अनुबंधन शॉपी या रस्त्यावरील रहिवाशांनी आपली वाहने मरुधर भवन ते कपिलतीर्थ या दक्षिण-उत्तर मार्गावर पार्किंग करण्यात यावी.
             गणेश मूर्ती विसर्जन झाल्यानंतर मोकळी मोटार वाहनाचा परतीचा मार्ग - पंचगंगा घाटावर गणेशमूर्तीचे विर्सजन झाल्यानंतर सर्व मोटार वाहने पंचगंगा घाट-शिवाजी पूल पंचगंगा स्मशान भूमी-सिद्धार्थ नगरमार्गे-चिमासो चौक या एकेरी मार्गाने मार्गस्थ होतील.
            वाहतुकीसाठी बंद व खुले करण्यात आलेले मार्ग- रत्नागिरी, पन्हाळा दिशेने कोल्हापूर शहरात येणारी मोटार वाहतूक शिवाजी पूल-पंचगंगा स्मशानभूमी-सिद्धार्थ नगर कमान मार्गे सी.पी.आर. चौक येथील. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरातून पन्हाळा दिशेकडे जाणारी वाहतूक सी.पी.आर. चौक सोन्या मारुती चौक-तोरस्कर चौक ते शिवाजी पूल मार्गे मार्गस्थ होतील.
            कोल्हापूर, पन्हाळा दिशेने कोल्हापूर शहरात येणारी अवजड वाहने (मालवाहतूक ट्रक, बस, एस.टी.,टॅक्टर-टॉली) बोरपाडळे फाटा ते वारणानगर ते वाठार अशी पुढे मार्गस्थ होतील. त्यांना नमूद वेळेमध्ये कोल्हापूर शहरातून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
            कोल्हापूर शहरातून गारगोटी, राधानगरी, गगनबावडाकडे जाणारी व तेथून येणारी सर्व मोटार वाहतूक (मालवाहतूक ट्रक, बस, एस.टी.,टॅक्टर-टॉली) ताराराणी पूतळा-रेल्वे उड्डाणपूल-हायवे कॅन्टीन चौक, सायबर कॉलेज चौक, रिंग रोड मार्गे संभाजीनगर स्टँड ते कळंबा जेल-साई मंदिर-रिंग रोड, नवीन वाशी नाका व फुलेवाडी रिंगरोडने पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. त्यांना नमूद वेळेमध्ये शहरात प्रवेश बंद करण्यात येत आहे.
            नमूद वेळेत शहरात येणारी जड, अवजड व मध्यम आकाराची (प्रतिबंदीत) मालवाहू वाहने यांना बाह्य मार्गावरून शहरात प्रवेश करण्यास पूर्णवेळ मनाई करण्यात आली आहे.
            नो पार्किंग- गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्या मार्गाला जोडणारे सर्व उप मार्गावर मुख्य मिरवणूक मार्गापासून 100 मीटर परिसरापर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाना (अत्यावश्यक सेवेतील मोटार वाहनांना वगळून) नो पार्किंग करण्यात येत आहे.
            पार्किंग सुविधा- गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या मोटार वाहन चालकांनी आपली वाहने पुढीलप्रमाणे पार्किंग करण्यात यावी. दुचाकीसाठी- दसरा चौक,सिद्धार्थनगर कमान, तोरस्कर चौक शाळा, दुधाळी, शिवाजी स्टेडियम, ताराराणी हायस्कूल मंगळवार पेठ, सरस्वती टॉकीज या ठिकाणी दुचाकी वाहनचालकांनी पार्किंग करावी.
            चारचाकीसाठी- 100 फुटी रोड, दसरा चौक, शाहू दयानंद हायस्कूल, दुधाळी, पेटाळा मैदान, गांधी मैदान याठिकाणी चारचाकी वाहनचालकांनी आपली वाहने पार्किंक करावयाची आहेत.           
             वरील सर्व मार्ग गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद व खुले करण्यात येत आहे.
0000


















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.