कोल्हापूर,
दि. 18 (जि.मा.का.): ग्रामविकास विभागाकडील केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय
सशक्तीकरण पुरस्कार 2019 अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक प्राप्त
झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत पंडित
दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने सादर केलेल्या नामांकनास राज्यामध्ये प्रथम पारितोषिक
(प्रमाणपत्र व रक्कम रूपये 30 लाख या स्वरूपात) मिळाले आहे. याकामी जिल्हा परिषद अध्यक्ष
शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सन्माननीय
सभापती तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान
लाभल्याचेही श्री. मित्तल म्हणाले.
जिल्हा
परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव,पंचगंगा नदी प्रदुषण
मुक्त करणे, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार, शिंगणापुर निवासी
क्रीडा प्रशाला, रेकॉर्ड सॉर्टिंग अंतर्गत डिजिटल रेकॉर्ड रूम,दिव्यांग उन्नती अभियान,बायोगॅस,
आधारवड,कॅन्सर सर्वेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना,बेटी बचाओ बेटी पढाओ,
वृक्ष लागवड, वॉटर एटीएम,आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने तसेच शिंगणापुर निवासी क्रिडा प्रशाला,रेकॉर्ड
सॉर्टिंग अतंर्गत डिजिटल रेकॉर्ड रूम इत्यादी डॉक्युमेंटरीचे सादरीकरण करण्यात आले
होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.