शिरोळमधील 4 गावातून 119 तर
करवीर मधील दोन गावातून 259 कुटुंबांचे स्थलांतर
कोल्हापूर,
दि. 10 (जि.मा.का.) : खबरदारीचा उपाय म्हणून आज अखेर शिरोळमधील चार गावातील 119
कुटुंबातील 501 व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील 250 कुटुंबातील 390
आणि कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात
आले आहे.
शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड)
मधील 26, राजापूरमधील 48, राजापूरवाडीमधील 18 व खिद्रापूरमधील 27 अशा 4 गावातून 119
कुटुंबातील 502 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 162
पुरुष, 190 स्त्रीया आणि 150 लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरच 135
जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील 250
कुटुंबातील 390 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 90
पुरुष, 300 स्त्रीया यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गावातील 450 जनावरांचेही
स्थलांतर झाले आहे. कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी
स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 13 स्त्रीया यांचा समावेश आहे. अशा
एकूण 378 कुटुंबातील 920 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.
000
करवीरमधील दोन मार्ग सुरु
अद्यापही 7 राज्यमार्ग आणि 13 प्रमुख जिल्हा मार्ग बंद
कोल्हापूर, दि. 10 (जि. मा. का.) : करवीर
तालुक्यातील कोल्हापूर परिते, गारगोटी गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्य हद्द हा
राज्य मार्ग क्र. 189 आणि शिरोली, दुमाला, बाचणी हा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 37
आज सुरु झाली आहे. अद्यापही 7 राज्यमार्ग व 13 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक
बंद आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी
दिली.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.