गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

14 सपटेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत


14 सपटेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
कोल्हापूर - 12 (जिमाका) : न्यायालयीन खटल्यांचा जास्तीत निपटारा करण्यासाठी शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण यांनी केली.
जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शहर व तालुका न्यायालयामधील कौटुंबिक, सहकार, औद्योगिक व कामगार न्यायालयामधील तडजोड योग्य प्रलंबित दिवाणी, फौजदारी असे 4110 व दाखलपूर्व 9003 खटले आहेत.  त्यांचा निपटारा या अदालतीमध्ये करण्यात येणार आहे. तरी या लोक अदालतीचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.