गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त 12 मिमी तर करवीरमध्ये सर्वात कमी 0.27 मिमी पाऊस/ नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांची 13 सप्टेंबर रोजी सभा/ खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन योजना सुरु



गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त 12 मिमी
तर करवीरमध्ये सर्वात कमी 0.27 मिमी पाऊस
            कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 41.73 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 30442.49 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 3.48 मिमी इतकी नोंद झाली.          
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 0 एकूण 825.04, शिरोळ - 0 एकूण 575.71, पन्हाळा - 1.86 एकूण 2396.14, शाहूवाडी 10.17 एकूण 2854.17, राधानगरी 3.17 एकूण 3027, गगनबावडा - 12 मिमी एकूण 6603.50, करवीर - 0.27 एकूण 1756.45, कागल 0.29 एकूण 1930, गडहिंग्लज 1 एकूण 1490.57, भुदरगड 1.40 एकूण 2688.40, आजरा 8.75 एकूण 3219.50 व चंदगड 2.83 मिमी एकूण 3076 इतका पाऊस झाला आहे.
00000

नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांची
13 सप्टेंबर रोजी सभा
       कोल्हापूर - 12 (जिमाका) : जिल्हा परिषदेकडे नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांच्याकडून कामकाज वाटप समितीची बैठक शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता व सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद जूने सभागृह कागलकर हाऊस कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सदस्य सचिव कामकाज समिती तथा कार्यकारी अभियंता यांनी केली.
        जिल्ह्यातील सर्व सुबेअ व मजूर संस्था यांचे जिल्हा परिषदेकडे नोंदणी असलेल्या व स्वत:चे पासबुक आहे अशांनी या बैठकीला हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन योजना सुरु
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र (मधमाशा पालन) योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यातील पात्र व्यक्ती, संस्था व व्यवसायिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, कोल्हापूर दुरध्वनी क्र. 0231-2651271 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0000


                                                                                                                       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.