सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी 4 लाख 29 हजार 660 रूपयांची मदत




कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.): नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी 4 लाख 29 हजार 660 रूपयांच्या निधी जमा केला असून या निधीतील 2 लाख रुपयांचा धनादेश कोल्हापूरचे सह जिल्हा उपनिबंधक एम.एम.जाधव यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.
        शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कोल्हापूर, परभणी, जालना, बीड, भंडारा, जळगाव, नांदेड, लातूर व मुंबई जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी 4 लाख 29 हजार 660 रूपयांची आर्थिक मदत जमा केली असून हा निधी पूरग्रस्तांसाठी दिल्याचे सह जिल्हा उपनिबंधक एम.एम.जाधव यांनी सांगितले.
        अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीत नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून नोंदणी व मुद्रांक विभागातील कोल्हापूर, परभणी, जालना, बीड, भंडारा, जळगाव, नांदेड, लातूर व मुंबई जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगाराशिवाय अतिरिक्त मदत म्हणून 4 लाख 29 हजार 660 रूपये रक्कम जमा केली आहे. त्यापैकी  सिध्दगिरी महाराज, कणेरी मठ यांच्याकडे 2 लाख 29 हजार 660 रूपये व आपत्ती सहायता निधी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे 2 लाख रूपये रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला. जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी निधी जमा करण्याकरिता कोल्हापूरचे सह जिल्हा निबंधक एस.एम.जाधव यांनी व्यक्तीश: संपर्क साधून नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.