कोल्हापूर, दि. 9
(जि. मा. का.) : उद्या 10 सप्टेंबर रोजी ताबूत विसर्जन मिरवणूक सुरळीत व सुरक्षित
पार पाडण्यासाठी शहरातील वाहतुकीचे नियमन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.
ताबूत विसर्जन मार्ग-बिंदू चौक ते शिवाजी रोड ते छ.
शिवाजी महाराज पुतळा ते माळकर चौक ते पान लाईन ते पापाची तिकटी ते गंगावेश ते
पंचगंगा घाट मार्गावर दुचाकी व कार जीप या आकारमानाची चारचाकी वाहने वगळून अन्य
सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
प्रवेश
बंद करण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे -गगनबावडा मार्गे कोल्हापूर शहर येणारी सर्व
अवजड वाहने ही फुलेवाडी नाका येथून कोल्हापूर शहरात न येता फुलेवाडी नाका ते फुलेवाडी रिंगरोड ते
आपटेनगर ते नवीन वाशीनाका ते कळंबा साईमंदिर ते संभाजीनगर मार्गे ये-जा करतील.
रत्नागिरी कडून कोल्हापूर शहराकडे येणाऱ्या अवजड वाहनांना शिवाजी पूल बंद करण्यात
आलेला आहे. शिवाजी पुल मार्गे शहरात येणाऱ्या एसटी व केएमटी बसेस पंचगंगा घाटाकडे
न जाता तोरस्कर चौक ते सीपीआर चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील. सीबीएस स्टॅंडकडून
रत्नागिरीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस या ताराराणी पुतळा ते धैर्यप्रसाद हॉल ते
जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंप ते सीपीआर चौक ते शिवाजी पुलमार्गे
धावतील.
सीबीएस
स्टँडकडून गारगोटी, राधानगरी, गगनबावडाकडे जाणाऱ्या एसटी बसेस या ताराराणी पुतळा
ते कोयास्को चौक ते हायवे कँटीन चौक ते सायबर चौक ते रिंगरोड मार्गे धावतील. वरील
सर्व मार्ग उद्या 10 सप्टेंबर सकाळी 12 वाजलेपासून ताबूत विसर्जन मिरवणूक
संपेपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद व खुले करण्यात येत आहेत, असा
जाहीरनामा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रसिध्दीस दिला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.