कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.)
: नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
जाहिर केला आहे. यामध्ये लघु व मध्यम उपक्रमांना सेवा व उत्पादन या व्यवसायाकरीता योजना
कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नवीन उद्योग सुरु करणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी असून
त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
मुख्यमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत उत्पादन उद्योगासठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी
10 लाख रुपयापर्यंत कर्ज मर्यादा आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहरी विभागाकरीता
15 टक्के व ग्रामीण भागाकरीता 25 टक्के अनुदान असून विशेष प्रवर्ग (अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी
सैनिक इत्यादी) शहरी भागाकरीता 25 टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान
आहे.
योजनेमध्ये उमेदवाराचे वय 18 ते 45 पर्यंत
असावे विशेष प्रवर्गाकरीता (अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक इत्यादी) 5
वर्षांनी शिथील करण्यात आले आहे. 10 लाखांवरील प्रकल्पासाठी किमान 7 वी पास व 25 लाखांवरील
प्रकल्पासाठी किमान 10 वीस पास उमेदवार पात्र राहील. कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा
लाभ घेता येणार आहे. लाभामध्ये यापूर्वी केंद्र
अथवा राज्य शासनाचा कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पध्दतीने
करण्यात आली असून maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ
सुरु करण्यात आले आहे. ही योजना शहरी भागाकरीता जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामीण भागाकरीता
खादी ग्रामोद्योग मंडळ याच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमदेवारांची ऑनलाईन
अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक
0231-2655438 या नंबर संपर्क साधावा.
0 0 0 0 00
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.